रेल्वे मार्ग

कुडाळ रेल्वे स्टेशन झाराप रेल्वे स्टेशन सावंतवाडी रेल्वे स्टेशन
१५ कि.मी. ८ कि.मी. २३ कि.मी.
०२३६२ – २२२६०४ ०२३६२ – २३२३२३ ०२३६३ – २५८३१५
कुडाळहून श्री दत्त मंदिरकडे येताना तीन आसनी रिक्षा अथवा सहा आसनी रिक्षा करुन येऊ शकता. बसने आल्यास श्री दत्तमंदिर थांब्या कडे उतरावे. तेथून दत्तमंदिर अर्धा कि.मी. दूर आहे. झाराप रेल्वे स्टेशनवर उतरल्यास तेथून श्री दत्तमंदिर ८ कि.मी. दूर आहे. झाराप स्टेशनवरुन झाराप थांबा ( मुंबई गोवा महामार्ग ) अर्धा कि.मी. दूर आहे. त्या झाराप थांब्या वरुन तीन किंवा सहा आसनी रिक्षा अथवा बसने माणगांवी येऊ शकता. सावंतवाडी रेल्वे स्टेशन वरुन सावंतवाडी बस स्थानकावर यावे. स्टेशन ते सावंतवाडी बस स्थानक हे अंतर ८ कि.मी. आहे. बस स्थानकावरुन तीन किंवा सहा आसनी रिक्षा अथवा बसने माणगांवी येऊ शकता.

बस मार्ग

कुडाळ बस स्थानक सावंतवाडी बस स्थानक कणकवली बस स्थानक
१४ कि.मी. १३ कि.मी. ५० कि.मी.
०२३६२ – २२२४२२ ०२३६३ – २७२०११ ०२३६७ – २२२२३९
कणकवली व कुडाळ वरुन येताना झाराप मार्गे यावे लागते. तर सावंतवाडीवरुन येताना आकेरी मार्गे माणगांवी यावे लागते. बस स्थानके ते श्री दत्तमंदिर माणगांव मधील अंतर वरीलप्रमाणे आहे. तीन किंवा सहा आसनी रिक्षा अथवा बसने माणगांवी येऊ शकता.

हवाई मार्ग

दाभोली विमानतळ (फोन : ०८३२ – २५४०८०६, इमेल : apdgoa@aai.aero) : वास्को ( दाभोली ) – गोवा येथील विमानतळावरुन सावंतवाडीला यावे. विमानतळ ते सावंतवाडी बस स्थानक हे अंतर ७७ कि.मी. आहे.सावंतवाडी बसस्थानकाहून तीन किंवा सहा आसनी रिक्षा अथवा बसने माणगांवी येऊ शकता. सावंतवाडी ते माणगांव हे अंतर १३ कि.मी. आहे.