"श्री. प. प. वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराज जयंती उत्सव", "श्रावण कृष्ण पंचमी – मंगळवार दि. १६.०८.२०२२" "श्रीं चे जन्मस्थानी" सकाळी ७ वा. नामस्मरणास प्रारंभ. ( २४ तास ) श्रीं चे जन्मस्थानी अभिषेक पूजा, महापूजा. दुपारी आरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद. दुपारी ०३.०० वा. पुराणवाचन. त्यानंतर जन्मोत्सवाचे कीर्तन ( ह. भ. प. श्री. पुरुषोत्तम पोखरणकर, पोखरण ) ,"मंगळवार दि. १६.०८.२०२२ सायं. ४.४५ वा. श्रीं चा जन्मसोहळा" सुंठवडा प्रसाद इ. "विश्वस्त मंडळ, श्री दत्त मंदिर माणगांव.

आगामी कार्यक्रम

श्रीमद् परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानन्द सरस्वती (टेंबे) स्‍वामी महाराज

श्री दत्त संप्रदायला, " दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा " हा सर्वश्रेष्ठ मंत्र देणारे साक्षात दत्तावतारी श्रीमद् परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानन्द सरस्वती (टेंबे) स्‍वामी महाराज यांचा जन्म श्रावण कृष्ण पंचमी इ.स.१८५४ साली माणगाव जि. सिंधुदुर्ग येथे झाला. भारतीय तत्त्वज्ञान व वाङ्मय यामध्ये स्वामीमहाराजांनी मोलाचे योगदान दिलेले आहे. श्री दत्तोपासना ही सांप्रदायिक आचार, सकाम भक्ती अशा मर्यादांमध्ये बंदिस्त झाली होती. श्रीस्वामीमहाराजांनी तिच्यात ज्ञानभक्तीचे, साक्षात्कार साधनेचे, अद्वैत तत्त्वदृष्टीचे अधिष्ठान स्पष्ट केले. त्यांच्या कार्यामुळे आणि वाङ्मयसंपदेमुळे दत्तभक्तीचा मूळ शुध्द प्रवाह प्रवाहित झाला. श्री. स्वामी समर्थ, श्री. साई बाबा, श्री. गजानन महाराज यांचे ते समकालीन होत.या सर्वांच्या चरित्र ग्रंथात श्रीमद् परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानन्द सरस्वती (टेंबे) स्‍वामी महाराजांचा उल्लेख आहे.

श्री क्षेत्र माणगाव येथे प. पू. टेंबेस्वामींनी स्वत:च ग्रामस्थांच्या मदतीने छोटेखानी दत्तमंदीर बनविले तेथे दत्तमूर्तीची प्रतिष्ठापना केली तेच सध्या अस्तित्वात असलेले दत्तमंदीर. नंतरच्या काळात हळूहळू सदर मंदिराचे जीर्णोद्धाराचे कार्य ट्रस्ट तर्फे करण्यात आलेले आहे. या मंदीराच्या प्रदक्षणेच्या मार्गात दोन्ही बाजूस १-१ असे दोन लाकडी खांब आहेत ते स्वामी महाराजांनी अभिमंत्रीत केलेले आहेत. त्यांच्या केवळ स्पर्शाने कुठल्याही प्रकारच्या बाधेचे निरसन होते. आज त्या मंदीरातच श्री वासुदेवानंद सरस्वतींचीही मूर्ती ठेवण्यात आली आहे. येथे संस्थान मार्फतच दत्तभक्तांना अभिषेक, पालखी, अन्नदान व जीर्णोद्धार या सारख्या सेवांमध्ये अर्थदानाने संमिलीत होता येते.

जितेंद्रिय गणाग्रणीरभिरत: परे ब्रह्मणि ।
कलौ श्रुतिपथावनेऽत्रितनयोऽवतीर्ण: स्वयम् ॥
करात्तसुकमण्डलु: कुमतखण्डने दण्डभृत् ।
पदप्रणतवत्सलो जयति वासुदेवो यति: ॥

श्रीवासुदेवानंदसरस्वती स्वामी महाराजकृत प्रश्नावली

श्री महाराजांनी तयार केलेली प्रश्नावली लोकोपकारार्थ एका प्रसिद्धीनिरपेक्ष सज्जन गृहस्थांनी दिली. ती येथे प्रसिद्ध केली आहे.

श्री क्षेत्र माणगांव - प्रमुख देवस्थाने..

श्री दत्तमंदिर

स्वामींचे जन्मस्थळ

साधनेची गुहा

यक्षिणी देवी

श्री दत्तमंदीर संस्थान

श्रीदत्त संप्रदायामध्ये श्रीमत परमहंस परिव्राजकार्य वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामींचे (थोरले महाराज) कर्तृत्व व स्थान मोठे आहे. थोरल्या महाराजांनी श्रीदत्तात्रेयांचा प्रथम अवतार मानल्या जाणाऱ्या श्रीपाद श्रीवल्लभ यांचे जन्मस्थान पीठापूर (आंध्र प्रदेश) आणि त्यांची कर्मभूमी कुरवपूर ही स्थाने, तसेच श्रीदत्तात्रेयांचे द्वितीय अवतार असणाऱ्या श्रीनृसिंह सरस्वती यांचे कारंजा येथील जन्मस्थान शोधून सर्व भक्तांसाठी खुले केले. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ हा मंत्र संपूर्ण विश्वाला दिलेला आहे. अशा महाराजांचे जन्मगाव हे माणगाव होय. अशा या थोर विभूतीचे जन्मगाव व जन्मस्थान तसेच आयुष्यातील पहिली ३५ वर्षे याच माणगाव या क्षेत्री गेली. श्रीस्वामी महाराजांच्या वास्तव्यामुळे ही भूमी पवित्र व पावन झाली आहे. माणगाव हे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्य़ामध्ये कुडाळ आणि सावंतवाडीजवळ आहे. येथे भव्य दत्तमंदिर असून मंदिरामागे गुहा आहे. येथे भक्त निवास असून भोजनाची व्यवस्था उपलब्ध आहे.